“शिवसेनेच्या ताकदीत वाढ; नाशिकमधील अनेक मुस्लीम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
441

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या बंडामुळे आता शिवसेनेत 2 गट पडले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा तर दुसरा गट उद्धव ठाकरेंचा.

तसेच पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे मुंबई महापालिकेवर सत्ता कायम राखण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मात्र अशातच आता शिवसेनेचं बळ वाढलं आहे. कारण नाशिकमधील अनेक मुस्लिम बांधवांनी शिवबंधन हाती बांधलं आहे.

हे ही वाचा : मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेला सोबत घेण्याची गरज नाही; रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला

नाशिक रोड व अशोका मार्ग परिसरातील मुस्लिम समाजातील अनेक तरुणांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेना पक्षाच्या शालिमार कार्यालयात मुस्लिम युवकांचा प्रवेश सोहळा झाला. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर आदींच्या उपस्थितीत उस्मान खान, अजीज शेख, विक्की वाघ, मुजाहिद शेख, मोईन शेख, शोएब शेख, अरबाज शेख, फरहान सय्यद, अयाझ शेख, सलमान शेख, शेहबाज शेख, तारीफ मेमन यांच्यासह अनेक मुस्लिम तरुणांनी शिवबंधन हाती बांधलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेला सोबत घेण्याची गरज नाही; रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला

शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वादात बच्चू कडूंची उडी, म्हणाले…

दु:खद बातमी! मनसे परभणी शहर अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात त्यांची प्राणज्योत मालवली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here