मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला, यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
काय माणूस आहे हा?? परळ मध्ये हजारो लोकांची गैरसोय होऊन चेंगराचेंगरी होत आहे पण हा माणूस फक्त स्वतःच्या पदासाठी फिरतोय. लोकांचा सयय्म तुटला तर तुम्ही कुठल्याही पदावर असाल तरी ते चोपून काढतील तुम्हाला. मराठीत म्हण आहे… अति तिथे माती, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे 5 तर भाजपाचे 4 उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय माणूस आहे हा?? परळ मध्ये हजारो लोकांची गैरसोय होऊन चेंगराचेंगरी होत आहे पण हा माणूस फक्त स्वतःच्या पदासाठी फिरतोय. लोकांचा सयय्म तुटला तर तुम्ही कुठल्याही पदावर असाल तरी ते चोपून काढतील तुम्हाला. मराठीत म्हण आहे… अति तिथे माती. https://t.co/M1WkbhP0ZE
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 11, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून संजय राऊत यांनी मानले काँग्रेसच्या दोन नेत्यांचे आभार
‘ती’ जबाबदारी सत्ताधारी पक्षाची; त्यामध्ये आम्हाला ओढू नका- अशिष शेलार
…तर मी निवडणूक लढणार नाही; बाळासाहेब थोरातांना उद्धव ठाकरेंचा मेसेज
विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी जाहीर