आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे व ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे व रामराजे निंबाळकर या दोघांना उमेदवारी दिली गेली. विधानसभेचं एकूण संख्याबळ आहे 251. त्यात कोणत्याही उमेदवाराला विजयी होण्यासाठी 26 मतांची आवश्यकता होती. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी पहिल्याच फेरीत विजयाच्या 26 मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांनी विजयाचा कोटा पूर्ण केला. खडसेंचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून एकच भाऊ, नाथा भाऊ अशा गर्जना गरजू लागल्या.
हे ही वाचा : राज ठाकरे यांच्यावर लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पुर्ण; राज यांची प्रकृती स्थिर
दरम्यान, ही निवडणूक लक्षात राहिल ती एकनाथ खडसेंमुळे. कारण भाजपमध्ये झालेल्या कोंडीमुळे वर्षभरापूर्वी एकनाथ खडसेंनी भाजप सोडली. आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि राष्ट्रवादीनं त्यांचा राजकीय उपयोग म्हणून त्यांना विधानपरिषदेत पाठवलं आणि त्यात ते यशस्वी ठरले. तर भाजपनं खडसेंच्या ऐवजी त्यांची मुलीला तिकीट दिलं., त्यात रोहिणी खडसेंचा पराभव झाला. त्यामुळे एकनाथ खडसेंसाठी ही निवडणूक अविस्मरणीय ठरली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा
“शिवसेनेचा विजयी झेंडा फडकला; ‘या’ निवडणूकीत सर्व 13 जागांवर मारली बाजी”
हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्को टेस्टला सामोरं यावं, मी ही तयार आहे; मेहबूब शेख यांचं आवाहन