मुंबई : राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. त्या बैठकीत ही निवडणूक बिनविरोध करण्यावर एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून काँग्रेस पक्षाने एक उमेदवार मागे घेण्याची भूमीका घेतली. मी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचा आभारी आहे, असं ट्विट करत संजय राऊत मानले आभार.
विधानसभेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसनं दोन उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होत. मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचया नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री ऊधदव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भुमिका घेतली. मी प्रदेश अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व ना.अशोक चव्हाण यांचा आभारी आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘ती’ जबाबदारी सत्ताधारी पक्षाची; त्यामध्ये आम्हाला ओढू नका- अशिष शेलार
…तर मी निवडणूक लढणार नाही; बाळासाहेब थोरातांना उद्धव ठाकरेंचा मेसेज
विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी जाहीर
…मग आपल्याला या सरकारची गरज काय?; निलेश राणे यांची राज्य सरकारवर टीका