आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल मतदान झालं. या निवडणूकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या निकालावरून आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? मनसेचा शिवसेनेला सवाल
राज्यसभेचं मतदान गुप्त पद्धतीने झालं असतं तर शिवसेनेच्या बहुतांशी आमदारांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं असतं, असं नवनीत राणा म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
हनुमान चालीसाचा विरोध करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जनतेची कामं केली पाहिजेत. जनतेमध्ये राहिले तर काहीतरी फायदा होईल. आता रडण्यात काहीही अर्थ नाही. तसेच आज शिवसेना सत्तेत असून देखील त्यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नाही, याचा अर्थ ते खूप मोठे अपयशी आहेत, अशी टीकाही नवनीत राणांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोल्हापूरात भाजपचे धनंजय महाडिक विजयी; शिवसेनेचे संजय पवार पराभूत
चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन तेल लावावं आणि…; राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंचा टोला