आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
डोंबिवली : राज्यसभा निवडणुकीत मनसे कोणाला मतदान करणार,यावरून चर्चा सूरू असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
जर काही जणांनी इगो बाजूला ठेवून राज साहेबांशी चर्चा केली असती तर साहेबांनी तो विचारही केला असता, परंतु काही लोक केवळ एमआयएम आणि अबू आझमी यांची मतं गोळा करण्यात बिझी असल्याने त्यांनी विचार केला नसेल. तसेच चर्चा झाली असती तर मनसेचे मत शिवसेनेलाही गेले असते, अशी शक्यताही राजू पाटील यांनी यावेळी बोलून दाखविली. आमदार राजू पाटील यांनी आज दिवा शहरातील प्रश्नांबाबत ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : औरंगाबादेतील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ; पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक
राज साहेब आणि आशिष शेलार हे मित्र आहेत. त्यांनी विनंती केली की तुमचा पाठिंबा तुम्ही भाजपाला देणार का? त्यावर राज साहेबांनी त्यांना सकारात्मकता दाखवली आहे. शेलार यांनी विनंती केली त्यांना मान दिला. बाकी कोणी विनंती केलीच नसेल तर विषय येतोच कुठे? असा सवालही राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या माझिरेंची घरवापसी; माझिरेंची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश