आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले असून यामध्ये निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद येथील पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ घातला.
पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. तसेच पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं आहे.
हे ही वाचा : मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या माझिरेंची घरवापसी; माझिरेंची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश
दरम्यान, कालपासून पंकजा मुंडे नॅाट रिचेबल आहेत. कालपासून आपण त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन दिवस पंकजा मुंडे बोलणार नाहीत अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…तर किरीट सोमय्याचं थोबाड लाल करू; औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचा इशारा