आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले असून यामध्ये पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात येणार का, याची चर्चा सुरू होती. मात्र यावेळीही पंकजा यांना डावलण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे या विधानपरिषदेत जाण्यासाठी उत्सुक होत्या. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तसं संकेतही दिलं होतं.
हे ही वाचा : “महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज; मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत का केली विनंती?”
मला विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाल्यास, मी त्या संधीचं सोनं करेन, असं पंकजा यांनी म्हणाल्या होत्या.
दरम्यान, जाहीर उमेदवारांमध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीवर टीका करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…
चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण तुमच्यावर…; दिपाली सय्यद यांचा सोमय्यांवर हल्लाबोल
पुणे मनसेला पुन्हा हादरा; ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम