आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी : महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडणार, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार, अशा काही बातम्या सोशल मिडियात आल्या होत्या. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
महाविकास आघाडी करताना मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे असं काही ठरलं नव्हतं. पवारसाहेबांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. आम्ही ते मान्य केलं, त्यानुसार आम्ही काम करतोय, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी केलं.
हे ही वाचा : “आगामी निवडणूकीपूर्वी भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटनासाठी अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंचा पत्राद्वारे महाराष्ट्र सैनिकांना आदेश; म्हणाले, आपल्याला भोंग्याचा प्रश्न आता…
राज्यात जर कडक निर्बंध नको असतील, तर…; टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ इशारा
“पुण्यात वसंत मोरे फॅक्टर चालणार, 5 नगरसेवक निवडूण आणणार”