आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
काँग्रेस नेते व पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच या गोळीबार इतर तिघे जण जखमी झाले असल्याचं समोर येत आहे.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्धू मूसेवाला यांची काळी एसयूव्ही इतर अनेक वाहनांसह व्यस्त असलेल्या रस्त्यावरून जाताना दिसत आहे. या ठिकाणाहून काही मिनिटांनी पुढे हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये, 2 वाहने घटनेपूर्वी मुसेवाला यांच्या काळ्या एसयूव्हीच्या मागे जाताना दिसत आहेत. यानंतर पांढऱ्या रंगाची बुलेरोही मागून वेगाने जाताना दिसत आहे.
हे ही वाचा : तुमची चंपाबाई आता कोल्हापूरात येत नाही; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला
दरम्यान, मुसेवाला याला गँगस्टर्सकडून धमक्या मिळत होत्या. असं असूनही पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देऊन एक दिवसापूर्वीच मुसेवालासह 424 व्हीआयपींची सुरक्षा हटवली होती. यानंतर मुसेवाला यांची लगेजच हत्या करण्यात आली.
#WATCH | Punjab: A CCTV video shows two cars trailing Sidhu Moose Wala’s vehicle moments before he was shot dead in Mansa district. pic.twitter.com/SsJag33XHb
— ANI (@ANI) May 30, 2022
महत्वाच्या घडामोडी –
आगामी काळात मीच देशाचा पंतप्रधान होणार- महादेव जानकर
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
“राष्ट्रवादीची मोठी खेळी; देहूतील भाजपच्या ‘या’ एकमेव आमदारानं हाती बांधलं घड्याळ”