अर्णव गोस्वामी हा भाजपचा प्रवक्ता, म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत- संजय राऊत

0
158

मुंबई : अर्णव गोस्वामी हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यांना नाईक कुटुंबीयांच्या घरी जाऊन समजून घेतलं असतं तर ज्याला मन आहे, त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा काम केलं नसतं. ही महाराष्ट्राची परंपरा नाही., असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच अर्णव गोस्वामी हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांच्या पक्षाचा तो राष्ट्रीय कार्यक्रम असेल, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचं म्हणणं ऐकून भाजपच्या हृदयाला पाझर फुटला नसेल तर त्यांनी मानवता, न्याय, सत्य या शब्दांचा वापर यापुढे कधीही करू नये, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल; विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

तुमच्या बाजूने बोललं तर ठीक, अन्यथा घरात घुसून खेचणार का?; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर गिरीश महाजनांचा सरकारला सवाल

“स्वतःचा पक्ष एका वर्षात बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत”

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार- वर्षा गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here