आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय पुणे दाैऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते अयोध्या दाैरा आणि निवडणूकीबाबत पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
पक्षावर नाराज असलेले डॅशिंग नेते वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी फोन करून बोलावून घेतलं आहे. त्यामुळे राज ठाकरे वसंत मोरे यांची नाराजी दूर करणार का?, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे…; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
दरम्यान, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा मेळावा आणि नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमात मोरेंची अनुपस्थिती दिसून आली. मात्र अखेर मेळावा सूरू झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मोरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. वसंत मोरे यांना ही बाब खटकली असून ते म्हणाले, रात्री उशीरा व्हॉट्स अॅपवरून मला कार्यक्रम पत्रिका आली. कार्यक्रम पत्रिकेत दहा जणांची नावं आहेत. प्रत्येकाला विषय दिला आहे. पण माझं नाव नाही. मीही कोअर कमिटीचा सदस्य आहे. पक्षाचा सरचिटणीस आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, अशी नाराजी मोरे यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या घडामोडी –
प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पहा व्हिडिओ
मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत जाहीर प्रवेश
केतकी चितळेला शिवीगाळ करणाऱ्यांवर आणि धमक्या देणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ