आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी बाबरी मशीद पाडण्यासाठी आपण अयोध्येत उपस्थित असल्याच्या दावा केला होता. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत फडणवीसांची खिल्ली उडवली. त्याला आता भाजप नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बाबरी पाडली तेव्हा मी त्या ठिकाणी होतो. त्यावेळी तिथे एकही शिवसैनिक नव्हता. उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला खोटं सांगू नये, दिशाभूल करू नये, असं सांगतानाच येत्या काळात भाजपा काय आहे, हे दाखवून देऊ, असा इशाराही रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिला आहे
हे ही वाचा : “आधी पुणे शहराध्यक्षपदावरून आणि आता…; मनसेचा वसंत मोरेंना पुन्हा एक धक्का”
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. राज्यातील घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकायला हवा. मुंबई तोडण्याचा कुणाचाही इरादा नाही. मुंबई ही अभेद्य आहे, असं राव साहेब दानवे म्हणाले आहेत.
दरम्यान, तुम्ही बाबरीवर चढण्याचा प्रयत्न केला असता, तर तुमच्या वजनाने ती खाली पडली असती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली; अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी”
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला, राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर आज तुम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला