सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त धक्का; हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

0
449

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळं शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आमदार आणि खासदारांपाठोपाठ राज्यातील अनेक महापालिका तसेच नगपालिकांचे नगरसेवक शिवसेनेत दाखल होत आहेत. अशातच आता. सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त झटका बसला आहे. हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.

हे ही वाचा :  मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा, देवेंद्र फडणवीसांना फोन, म्हणाले, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण….

आमदार तानाजी सावंत यांचे मुळ गाव असलेल्या वाकाव गावात माढा, मोहोळ, पंढरपुर तालु्क्यासह कुडूवाडी शहरातील हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जयघोष करीत पाठिंबा दर्शवत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, आमदार तानाजी सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी शिंदे यांच्या गटात प्रवेशाचा कार्यक्रम रविवारी पार पडला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

संजय राऊतांवर टीका करताना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

…तर मी ‘सिलव्हर ओक’वरही जायला तयार; शिंदे गटातील आमदार दीपक केसरकरांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here