Home महाराष्ट्र तुरूंगात दणके बसले नाहीत, याबद्दल सरकारचे आभार माना; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला...

तुरूंगात दणके बसले नाहीत, याबद्दल सरकारचे आभार माना; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, राज्यातल्या राजकारणातील वातावरन तापलं आहे. अशातच या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे.

कसल्याही परिस्थितीत आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटलं आहे. यानंतर राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली. तर पोलिसांनी राणा दांपत्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी अटक केली. त्यानंतर हे प्रकरण आता दिल्लीपर्यंत पोहचलं आहे. यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उभारणार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

प्रामाणिक दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली आहे. शिवसेनेची दादागिरी वायफळ नाही आहे. मातोश्री हे शिवसेनेचं प्रेरणास्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने वागता, ही दादागिरी नाही का?, असा सवाल बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यांना यावेळी केला. ते अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.

तुम्हांला लाज नाही वाटत., अशा पद्धतीने वागता. तुमच्या घरासमोर एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल का तुम्हांला. शिवसेना या मुठीतील नाही आहे. सुदैव तुमचं असं आहे, तुम्हांला दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना, असा टोलाही बच्चू कडूंनी यावेळी राणा दाम्पत्यांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण, हे लवकरच कळेल”

“प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”

शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिला नाही; भाजपचा हल्लाबोल