आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जालना : राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असताना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. मात्र अशा स्थितीतही कोरोनाची चौथी लाट येण्याची भिती आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.
जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु, राज्यातील नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झालें आहे. त्यामुळे या लाटेचा अधिक परिणाम जाणवणार नाही, असंही राजेश टोपे यांनी यावेळी म्हटलं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “…आणि संजय राऊत-अजित पवार आपापसातच भिडले”
दरम्यान, कोरोनाची चौथी लाट कोरोना प्रतिबंधात्मक लसच रोखू शकते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ज्या भागातील नागरिक येण्यास तयार नाहीत, अशा ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणं गरजेचं आहे. तसे निर्देशही आरोग्य विभागाला दिले आहेत., असंही राजेश टोपेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”
…तर आज राज ठाकरेही मुसलमान झाले असते- रामदास आठवले
“मनसे आणि भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत”