आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचा खासदार असलेल्या शिरूरमधून पुढच्यावेळी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होतील असं वक्तव्य केलं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”
संजय राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी ते वक्तव्य केलं असावं. उद्या मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून उमेदवार जाहीर करील, पण उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना आहे?, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरे यांना आहे?, असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
…तर आज राज ठाकरेही मुसलमान झाले असते- रामदास आठवले
“मनसे आणि भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत”
“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन…”; अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य