आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. काल 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, असा राज यांनी यावेळी सरकारला इशारा दिला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर आता मनसे नेते गृहविभाग खात्याच्या निशाण्यावर आले आहेत. मनसेच्या 2 मोठ्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : “विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं?, एक खरबूज, टरबूज सोसायटी देखील नाही काढली पठ्ठ्यानं”
मनसे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ही नोटीस जुन्या प्रकरणात बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांनी कालपासूनच जुनी प्रकरणं तपासण्यास सुरूवात केली आहे. अविनाश जाधव यांना 2016 मधील एका जुन्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अविनाश जाधव यांना 2016 च्या गुन्ह्यात चाैकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“जसं शेन वाॅर्नला स्वप्नात सचिन तेंडूलकर दिसायचा, तसं राज यांना शरद पवार दिसतात”
“राजकीय घडामोडींना वेग, ‘या’ निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी”