Home महाराष्ट्र …म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता- नारायण राणे

…म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता- नारायण राणे

मुंबई : शिवसेनेत परत येणं जमणार नाही, असं म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता, असं वक्तव्य भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलं आहे. ते ‘लोकसत्ता’ या वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेनेत परत येणं जमणार नाही, असं म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये कोणाला कोणती पदं द्यावी आणि कोणाला कोणती देऊ नयेत, यात तरबेज असणारी अनेक लोकं आहेत. मलाही मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आलं होतं. परंतु तुम्हालाच मुख्यमंत्री करणार या आश्वासनावर काँग्रेसमध्ये दहा वर्षे गेली, असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, ज्या पद्धतीनं मी मुख्यमंत्रीपद हाताळलं, प्रशासन चालवलं त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी होणार नाही, असं अनेकांना वाटलं असावं. आज मी 22 वर्ष या पदाला लांबून पाहिलं, अशी खंतही नारायण राणेंनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी-

शाहू राजांचा फडणवीसांनी कार्यकर्ता म्हणून उल्लेख केला, यावरुन सचिन सावंतांची टिका; म्हणाले…

17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल

…त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा- चंद्रकांत पाटील

“तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…”; राज्य सरकारचं आवाहन