मुंबई : छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिनी असून, यानिमित्तानं त्यांना राजकीय नेते, समाजातील मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला. त्यावरून फडणवीसांना ट्रोल करण्यात आलं. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच जाहीर निषेध, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, थोर सामाजिक कार्यकर्ते वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन,” असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल
…त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा- चंद्रकांत पाटील
“तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…”; राज्य सरकारचं आवाहन
“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत”