आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच आता गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी : ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
गुणरत्न सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. तर,इतर आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…
“सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”