आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला तब्बल 400 जागा मिळणार असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलच्या उद्घाटनानिमित्त ते आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती आणि एकूणच राज्य कारभाराविषयी सर्वसामान्यच काय तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे. त्यांचे नेतृत्व आणि कामाची पद्धत यामुळे केंद्र स्तरावर सर्वसामान्य नागरिकांच्या विकास योजना राबविल्या जात आहेत. देशाची आर्थिक स्थिती आणि जीडीपी याच्या मध्ये वाढ होत आहे. त्यांच्या कामाची पद्धतीने भाजप सर्वसामान्य जनतेच्या जवळ जात आहे, असं रामदास आठवलेंनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा : रमजान ईदपर्यंत मस्जिदींवरील भोंगे उतरवा; राज ठाकरेंचं सरकारला आवाहन
देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा मोदी यांच्याकडे आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली 2024 झाली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप तब्बल 400 जागा मिळवेल.असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
एक काळ असा होता की देशाच्या लोकांना काँग्रेस पक्षाचे विलक्षण आकर्षण होते. मात्र आजच्या गांधी घराण्यामुळे ते राहिलेले नाही. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी मध्ये समाविष्ट असणाऱ्या शिवसेना पक्षावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…
“सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”