आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज ठाकरे आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेतल्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. यानंतर दादर पोलिसांनी मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर टीका केली.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं- चंद्रकांत पाटील
आज रामनवमीचा सण आहे. राज ठाकरेंनी जसं सांगितलंय, की सगळे सण उत्साहात साजरे व्हायला हवेत. विविध ठिकाणी आमच्या विभागात राम नवमीचा उत्सव साजरा होत आहे. त्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही हा रथ तयार केला आहे. ज्या ज्या उत्सव मंडळांकडून किंवा मंदिरांकडून आमच्याकडे रथासाठी मागणी होईल, तिथे आम्ही हा रथ पाठवू. तिथे हनुमान चालिसाचं पठण होईल, असं सांगतानाच “मुळात ज्यांनी हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवलंय, त्यांना देखील जाग यावी हा देखील त्यामागचा उद्देश आहे”, असं यशवंत किल्लेदार यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलं हिंदुत्व सोडून दिलं. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात, असंही यशवंत किल्लेदार म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
गिरीश भाऊंनी सरकारमध्ये मला एकटं सोडलं; गुलाबराव पाटलांचा टोला
मनसे-भाजप युती होणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
पवार साहेब ही काळाची गरज, ते जर आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच असतं- यशोमती ठाकूर