Home महाराष्ट्र भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्हांला सोडलं, म्हणजे हिंदुत्वाला नाही; कोल्हापूरातून उद्धव ठाकरेंनी...

भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्हांला सोडलं, म्हणजे हिंदुत्वाला नाही; कोल्हापूरातून उद्धव ठाकरेंनी डरकाळी फोडली

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच हिंदुहृदय सम्राटांनी निर्माण केलेली शिवसेना आता राहिलेली नाही, असा आरोपही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरूनही उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे काय हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही., असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

हे ही वाचा : शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार- रामदास आठवले

सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. अशी सभा घेण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरा-समोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे, की पृथ्वीराजच्या रूपाने 21 वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी मनापासून अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे., असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, तरी नशीब ही निवडणूक आहे, राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, पण कुस्तीमध्ये जर भाजप उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. सीबीआय, ईडी इत्यादींची धाड आणि मग स्वत:मध्ये धमक काही नसताना, मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आता राज ठाकरे देणार ‘करारा जवाब; ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित

“मोठी बातमी! अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी”

नितीन गडकरींनंतर आता रावसाहेब दानवे राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना पुन्हा उधाण