आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कल्याण : एकीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद विकोपाला गेलेले असताना कल्याण पंचायत समितीमध्ये मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपने आघाडी करत एकत्रितरित्या सत्तेचा आस्वाद घेत असल्याचं चित्र आहे.
पंचायत समिती च्या निवडणुकीनंतर सभापती पदाची निवडणूक बिनविरोध करत शिवसेना राष्ट्रवादी भाजप या तिन्ही पक्षांनी सभापती पदाचा आस्वाद घेतला. बिनविरोध निवड झालेल्या भाजपच्या सभापती रेश्मा भोईर यांनी सर्व पक्षीय सदस्याच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
हे ही वाचा : कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच; UPA अध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटलांचा टोला
कल्याण पंचायत समितीत भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 3 तर शिवसेनेचे 4 असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबलनुसार शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे पंचायत समितीत वर्चस्व आहे. मात्र कल्याण पंचायत समितीचे सभापती पद शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी उपभोगलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमिताभ-जया-रेखा यांच्या प्रेमाचा त्रिकोण”
“शरद पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 48 हजार समर्थकांसह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”
द काश्मीर फाईल्स चित्रपटावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…