Home महत्वाच्या बातम्या …मग आम्हाला कसला इतिहास शिकवताय?; आशिष शेलारांच शिवसेनेवर टीकास्त्र

…मग आम्हाला कसला इतिहास शिकवताय?; आशिष शेलारांच शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला होता. आता यावरुन आम्हाला कसला इतिहास शिकवताय? असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.

आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे. आम्हीच प्रस्ताव पाठवला होता. काँग्रेस सरकारने ते मुंबईला दिले नाही. आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना “योग्य ठिकाणी” चिमटा काढून हे विचारा एकदा. पत्रपंडित हो! कोणी इतिहास बदलला हेही एकदा तपासून पहा,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुर्दैवाने समलिंगी म्हणणारे नालायक काँग्रेस सध्या तुम्हाला प्रिय वाटतेय. काँग्रेस सावरकरांचा जो इतिहास सांगत आहे तो तुम्हाला प्रिय वाटतोय..?  मग आता आम्हाला कसला इतिहास शिकवताय? तुम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावर केव्हाच “इतिहास जमा” झाला आहात, असंही आशिष शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं जाईल; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

उद्या हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय असंही विचारु शकतात; शिवसेनेची टीका

उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार.. ; मुख्यमंत्र्यांच पत्राद्वारे कौतुक

IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना इशारा