आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. अश्यातच आता “तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असं राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. यावरुन आता अमोल मिटकरी विरूद्ध शिवसेना-मनसे असा वाद निर्माण झालाय.
राज्य सरकारने 2000 मध्ये 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख जाहीर केली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तिथीचा वाद उकरुन , मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करणं आता बंद झालं पाहिजे. राज्यातील तरुणांची अशीच इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तिथी आणि तारखेच्या बाहेर पडून विश्वव्यापक दृष्टीकोनातून पाहावं, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “ठाकरे सरकार फक्त म्हणण्यापुरतं, मात्र प्रत्यक्षात लाभ मात्र पवारांना…”; शिवसेना खासदारांचं मोठं वक्तव्य
आपण सणवारही तिथीनुसार साजरे करतो तर मग शिवजयंतीही तिथीनुसार साजरी केली जाणार. मिटकरी फालतू विधान करून प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करतात, असं अमेय खोपकर म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, अमोल मिटकरी यांना विनंती आहे की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका. शासनाने जन्मतारीख शोधून काढली त्यानुसार शासन शिवजयंती साजरी करेल. पण शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्याप्रमाणे ते साजरे करत आहेत. तुम्ही संभ्रम निर्माण करू नका”, असं खासदार विनायक राऊत म्हणालेत. त्यामुळे शिवजयंतीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं दिसून येतंय.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल- करूणा शर्मा
एम आय एम ची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; मविआ-एमआयएम युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता