आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी शिवसेना जोडली जाणार नाही, असं स्पष्ट मत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार इम्तियाज जलील यांचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं, त्यामुळे…; भाजपचा हल्लाबोल
दरम्यान या पोस्टमध्ये “जलील फडणवीसांना म्हणत आहे की, मी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो. त्यावर फडणवीस म्हणत आहेत की, मग मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदुत्वाच्या गप्पा मारतो,” असं अंबादास दानवे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
तुमच्या निष्काळजीपणामुळे बीड जिल्ह्याची बदनामी; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर
आमची तीन चाकं मजबूत, शिवसेनेला MIM ची गरज नाही; अब्दुल सत्तार कडाडले
…ही तर चांगली गोष्ट; राष्ट्रवादी-MIM युतीवरून सुप्रिया सुळेंचं सूचक विधान