आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. या चार राज्यात जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला. याच पार्श्वभूमीवर आज नागपुरात भाजपच्या वतीनं फडणवीसांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विमानतळापासून रेडिसन ब्ल्यू हॉटेलपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरींनी शिवसेना व राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला.
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. यावरून बोलताना गडकरींनी राष्ट्रवादी व शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. गोव्याच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली., असा टोला गडकरींनी यावेळी राष्ट्रवादी व शिवसेनेला लगावला.
हे ही वाचा : मनसेचा आदी IPL च्या बसेसवर खळखट्याक; आता आदित्य ठाकरेंवर निशाणा
गोव्यात आम्हाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. मनोहर पर्रिकर असतानाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपसाठी अनुकूल स्थिती असतानाही आम्हाला स्पष्ट बहुमत मिळत नव्हतं. अशा स्थितीत फडणवीस यांची गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलं. गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं अपशकून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्याच्या जनतेनं त्यांचं स्थान काय आहे हे दाखवून दिलं, असा घणाघात गडकरींनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपलं नशीब आजमावयला आले होते, पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला
“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरूच, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
“माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन, कोपरगाव येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास”