मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विधानसभेची निवडणूक आम्ही युती म्हणून लढलो होतो. मात्र आमच्या जागा कमी यायला पाहिजेत असं काहीसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आधीच ठरलं होतं. त्यावेळी वाटलं होतं की हे सगळं स्थानिक पातळीवर होतं आहे. जसं पुण्यात झालं, पुण्यात थेट राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत केली. त्यामुळे आमच्या दोन जागा पुण्यात गेल्या. नंतर लक्षात आलं की त्यांचं सगळं आधीच ठरलं होतं, असं देवंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आम्हाला 120-125 जागा मिळायला हव्या होत्या मात्र आम्हाला 105 च जागा मिळाल्या. थोड्या थोड्या मतांनी आमच्या भरपूर जागा गेल्या. मात्र या शिवसेनेला मोठा फटका बसला. आमच्या 130 जागा येऊ शकल्या असत्या आणि शिवसेनेच्या जागा 90 च्या आसपास जागा येऊ शकल्या असत्या. मात्र जे काही शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरलं होतं त्याचा फटका बसला, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आमच्या नाकाखाली काय सुरू होतं ते उशिरा समजलं- देवेंद्र फडणवीस
…तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता- रामदास आठवले
आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार- देवेंद्र फडणवीस
जो है पप्पू के यार, कैसे करे मोदीजी से प्यार?; राहूल गांधींवरुन भाजपची शिवसेनेवर टीका