Home महाराष्ट्र संजय राऊतांनी दिला राज ठाकरेंना सल्ला; आता राज ठाकरे म्हणतात…

संजय राऊतांनी दिला राज ठाकरेंना सल्ला; आता राज ठाकरे म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे आध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावीळी राज ठाकरे बोलत होते.

हे ही वाचा :  मुंबईत कपलने सर्वांसमोर केलं खुल्लम खुल्ला किसींग, पहा व्हिडिओ

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसे च्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याचाच भाग म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच राज ठाकरे यांनी उद्दघाटन केलं आहे.

दरम्यान, यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

मला तर असा संशय आहे की, शरद पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे- निलेश राणे

“भाजप-शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते; गुलाबराव पाटलांनी आठवण उगाळली”