आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : आज बीडमध्ये अखेर तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केली. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी सपनाचे कन्यादान केलं आहे.
बीडमध्ये राहणारे सपना आणि बाळू मागील अडीच वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये होते. अडीच वर्षांनंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. मात्र या लग्नाला समाजात विरोध असल्यानं लग्न नेमकं कसं करावं, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. मात्र आज अखेर सामाजिक न्याय विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
हे ही वाचा : मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेना महिला नेत्याचा मनसेत प्रवेश
सुरुवातीला या लग्नाला बाळूच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र या दोघांच्या प्रेमापुढे कुटुंबाला झुकावे लागले. आज विवाह बंधनात अडकल्यानंतर या दोघांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. हे लग्न शेवटपर्यंत टिकेल असा विश्वास देखील या दोघांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बँड, बाजा, वरात मिरवणूक लग्नाच्या अक्षदा आणि बीडचे ग्रामदैवत कन्कलेश्वर मंदिर परिसरात हा विवाह पार पडला आहे. विवाह प्रसंगी सपना आणि बाळूला अनेक सामाजिक स्तरातून मदत करण्यात आली. संसार उपयोगी साहित्य मनी मंगळसूत्र याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले यांनी स्वीकारून मामाचे कर्तव्य पार पाडले.
महत्वाच्या घडामोडी –
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का; ‘या’ माजी नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश
“चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”