Home महाराष्ट्र …त्यामुळे राज्यपालांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे; देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण

…त्यामुळे राज्यपालांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे; देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून सत्ताधारी पक्षांकडून टीका होत आहे. याला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.

“मला असं वाटतं की जाणीवपूर्वक असंवैधानिक कृती करायच्या आणि मग राज्यपालांच्याविरुद्ध बोलायचं. एक प्रकारचा नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. मला असं वाटतं की राज्यपाल एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ती संविधानानेच काम करते. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शरद पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती; आता नारायण राणे म्हणतात…

“सरकार संविधानानुसार काम करत नाहीय. ज्याप्रकारचे कायदे आणि कायदा दुरुस्ती सरकार करत आहे ते कुठेच संविधानाच्या नियमांमध्ये बसत नाहीत. जेव्हा राज्यपाल याकडे लक्ष वेधतात तेव्हा त्यांना टार्गेट केलं जातं. त्यांचा अपमान केला जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

यंदा बाकीच्या पक्षांना हाणायचं म्हणजे, हाणायचं; ‘राज’गर्जना बरसली

मनसेत सुसाट इनकमिंग, गोरेगाव येथील अनेक तरूण-तरूणींना हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

पटापट पेट्रोल टँक भरून घ्या, कारण मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार; राहुल गांधींचा टोला