आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
धर्मशाळा : आजचा भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 विकेट्ने पराभव करत मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली.
भारताने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत 183 धावा केल्या. श्रीलंकेकडून सलामीवीर पी.निसंकाने 53 चेंडूत 75 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ज्यात 11 चाैकारांचा समावेश होता. तर शेवटच्या काही षटकात कर्णधार दसून शनाकाने केवळ 19 चेंडूत नाबाद 47 धावांची विस्फोटक खेळी करत श्रीलंकेला 180 चा टप्पा पार करून दिला. शनाकाच्या या खेळीत 2 चाैकार व 5 षटकारांचा समावेश होता. भारताकडून जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार, हर्षेल पटेल, युझवेंद्र चहल व रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा : मराठी भाषावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व पक्षांना खडसावलं, म्हणाले…
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य केवळ 17.1 षटकात 3 विकेट गमावत पूर्ण केलं. भारताची सुरूवात खराब झाली. भारताने पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. यानंतर इशान किशन व श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत भारताला 5 षटकात 44 धावांपर्यंत नेलं. यानंतर इशान किशन मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर आलेल्या संजू सैमसनने श्रेयस अय्यरसोबत डाव सुधारला. दोघांनी चाैथ्या विेकेटसाठी 84 धावांची भागीदारी करत भारताला सुस्थितीत नेऊन ठेवलं. त्यानंतर सेट झालेला सैमसनने मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. सैमसनने 25 चेंडूत 39 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या सर रवींद्र जडेजाने अय्यरसोबत भारताची आणखी पडझड होऊ न देत भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून श्रेयस अय्यरने 44 चेंडूत 74 धावांची नाबाद आक्रमक खेळी केली. तर सर जडेजाने 18 चेंडूत नाबाद 45 धावांची विस्फोटक खेळी केली. अय्यरने आपल्या खेळीत 6 चाैकार व 4 षटकार ठोकले. तर जडेजाने 7 चाैकार व 1 षटकार मारला. तर श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने 2, तर दुशमंता चमिराने 1 विेकेट मिळवली.
महत्वाच्या घडामोडी –
आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…
“नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा