Home महाराष्ट्र आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर,...

आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेऊन आले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणांमध्ये भाजप, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून आदित्य ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यावरून आता आदित्य ठाकरे यांचे वडील व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला गेला. यावरून उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्य कसं असेल, याचा खुलासा केला.

हे ही वाचा : “नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

आमच्यावर कुणीही राजकारण लादलेलं नाही. त्या काळी माझीही आदित्यसारखी राजकारणात सुरुवात होत होती. घरात जन्मापासून जे वारे वाहतात, ते अंगात भिनतात. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार देखील नाही. जर तुला जनतेनं स्वीकारलं तर तू तुझ्या वाटेनं पुढे जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

“मनसेचा वर्धापन सोहळा यावेळी पहिल्यांदाच मुंबईबाहेर, ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा वर्धापन सोहळा”