आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राज्यात भाजप-शिवसेना युतीवरून चर्चा सूरू असताना अशातच काल भाजप खासदार रक्षा खडसे यांनी शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. यावरून आता रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही भेट विकासकामाच्या मुद्द्यावरून झाली. केंद्रातील जल जीवन मिशन योजनेबाबतची भेट झाली, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेंनी या भेटीनंतर दिली.
हे ही वाचा : “सोलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”
दरम्यान, शिवसेना आणि भाजपच्या छुप्या युतीबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता, त्यावर त्यांनी, आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंत अशा युतीबाबत वरिष्ठांचे आदेश नाहीत. मला असे वाटतं, राज्यात महाविकास आघाडी-भाजप संघर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात सेना-भाजप युतीची परिस्थिती राहणार नाही. मात्र निवडणुका पुढे कशाप्रकारे लढवायच्या हे नेतेमंडळी ठरवतील, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“खासदार सुप्रिया सुळे ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित, सलग 7 वर्षे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी”
“शिवसेना-भाजपच्या युतीसाठी मी स्वत: पुढाकार घेणार असून, यासंदर्भात लवकरच संजय राऊतांना भेटणार”
महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…