Home महाराष्ट्र “खासदार सुप्रिया सुळे ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित, सलग 7 वर्षे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी”

“खासदार सुप्रिया सुळे ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित, सलग 7 वर्षे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने गाैरविण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. तसेच सुप्रिया सुळे सलग 7 वर्षी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.

हे ही वाचा : “शिवसेना-भाजपच्या युतीसाठी मी स्वत: पुढाकार घेणार असून, यासंदर्भात लवकरच संजय राऊतांना भेटणार”

दरम्यान, येत्या 26 मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती फाउंडेशन के. श्रीनिवासन यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…

“मनसेत पक्षप्रवेशाचं जोरदार वादळ; शेकडो नागरिकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

“जळगावात शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”