आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरुन आता भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली.
संजय राऊतांनी राज्यात ईडीच्या सूरू असलेल्या कारवाईवरून ईडी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर बोलताना राणेंनी राऊतांवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. यावरून राणेंनी राऊतांना, ईडीवर बोलू नको, बिडी प्यायला लावतील, असा टोला यावेळी लगावला.
हे ही वाचा : “काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश”
दरम्यान, विकासावर बोला, ते बोलत नाही हा माणूस. जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल वृत्तपत्रांनी बातमी दिली, राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, अरे यावर काहीतरी बोल, राज्याची दयनीय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचं आंदोलन सुरु आहे. पण काही नाही, इंडस्ट्री मिनीस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले. कंबोजने सांगितलं, चेक दिला संजय राऊतला. एका बाजूला पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना, आणि त्यांना माहितीय, आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कोण नाहीये, असा घणाघात राणेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून नारायण राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली ”; शिवसेनेचा पलटवार
नारायण राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे; आता संजय राऊत, म्हणतात…
भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी आमदार पुत्राचा भाजपात प्रवेश