आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा निल सोमय्या तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे., असा गाैफ्यस्फोट संजय राऊतांनी यावेळी केला. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात वापरण्यात आलेल्या कार्पेटची किंमत 9.50 कोटी रुपये असल्याचा दावाही राऊत यांनी केलाय. तसंच मोहित कंबोज यांच्या प्रकल्पांमध्येही पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा असल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची निराशा केली, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, असा जोरदार टोला संदीप देशपांडे यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, शिवजयंतीला बंधनं घालणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे की आज ज्या पद्धतीची गर्दी जमली होती, त्यामुळे कोरोना पसरणार नाही का? कोरोना पसरवायला ही गर्दी नव्हती का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे नव्हती तर संजय राऊत यांची वैयक्तिक होती. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महत्वाचे मंत्री नव्हते. तसंच आजची पत्रकार परिषद नाही तर केवळ भाषण होतं, अशी टीकाही देशपांडे यांनी केलीय. तसंच इतर नेत्यांनी नातेवाईकांच्या नावे संपत्ती करु नये, जेणेकरुन अशा पद्धतीची कारवाई होणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“बाॅलिवडूचा डिस्को किंग हरपला, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन”
ईडीची भिती दाखवता काय?; पण लक्षात ठेवा, आम्ही…; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा