Home महाराष्ट्र किरीट सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

किरीट सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

पुण्यातील जम्बो कोव्हिड घोटाळ्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावरून आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : जळगावमध्ये शिवसेनेचा भाजपला पुन्हा दणका; आणखी 2 नगरसेवक फोडले

आम्ही सगळीकडची घाण साफ करण्याचं काम करत आहोत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला. मात्र, या प्रकरणावर आदित्य यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. 2 दिवस गोव्यात शिवसेना उमदेवारांचा प्रचार केल्यानंतर आज आदित्य ठाकरे पुण्यात होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, पर्यावरण वातावरण निर्माण झालं पाहिजे. येथील नदीतील 10 हजार टन गाळ काढला आहे. नदीतील गाळ काढून नदी स्वच्छ केली जाईल. ज्यांनी कोणी गाळ टाकलाय त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगतानाच स्थानिक नागरिकांनी स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रकांतदादा निष्पाप, निर्मळ मनाचे, सरकार पडत नसल्यानं नैराश्यात, पण प्रयत्न सूरू ठेवा”

“मनसेत इनकमिंग सूरुच, कट्टर मनसे समर्थकानं हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

“लाॅर्ड ठाकूरवर पैशांचा पाऊस; तब्बल 10 कोटीला ‘या’ संघानं घेतलं आपल्या संघात”