Home महाराष्ट्र मुंबईत पर्यटनाला मिळणार चालना, दादर चौपाटीच्या धर्तीवर ‘व्ह्युवींग डेक’ उभारणार- आदित्य ठाकरे

मुंबईत पर्यटनाला मिळणार चालना, दादर चौपाटीच्या धर्तीवर ‘व्ह्युवींग डेक’ उभारणार- आदित्य ठाकरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईतील चौपाटी परिसरातील बहुतांश समुद्र पातमुखांवर दादर चौपाटीच्या धर्तीवर ‘व्ह्युवींग डेक’च्या स्वरूपात नवीन पर्यटन स्थळे उभारण्याचे आदेश राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईला निसर्गदत्त लाभलेल्या अथांग समुद्राचे, त्यात उसळणाऱ्या लाटांचे विहंगम दृश्य नजरेने टिपता यावे, त्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, त्यातून पर्यटनाला चालना मिळावी या बहूउद्देशाने दादर, चैत्यभूमी येथील चौपाटीनजीक समुद्र पातमुखावर ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक’ अवघ्या 10 महिन्यात उभारण्यात आले आहे. या व्ह्युवींग डेकची संकल्पना मांडणारे राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्तेच बुधवारी लोकार्पण झालं.

हे ही वाचा : मनसेचं मिशन पुणे; राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ वर महत्वपूर्ण बैठक

पावसाचे पाणी वाहून समुद्रात नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या पातमुखावर केवळ १० महिन्यांचा कालावधीत उभारण्यात आलेल्या या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय भव्य ‘व्ह्युइंग डेक’मुळे मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना एक अभिनव पर्यटन स्थळ उपलब्ध झाले आहे”, असे प्रतिपादन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

दरम्यान, याप्रसंगी, आ.सदा सरवणकर, पालिका सभागृह नेता विशाखा राऊत, माजी महापौर व नगरसेवक मिलिंद वैद्य, माजी महापौर व नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेविका प्रीती पाटणकर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उपआयुुक्‍त (परिमंडळ 2) हर्षद काळे, सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.

दादर चौपाटी लगतच्या ‘व्ह्युवींग डेक’ची ठळक वैशिष्ट्ये

– डेकची उंची समुद्रापासून 10 फूट असून क्षेत्रफळ 10 हजार चौरस फूट इतके आहे.

– डेकचे बांधकाम मार्च 2021 मध्ये सुरू होऊन केवळ 10 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत बांधकाम पूर्ण.

– डेकला समुद्रकाठी उभारलेल्या 26 पिलर्सचा टेकू देण्यात आलेला आहे.

– डेकवर 300 व्यक्ती उभे राहू शकतात तर 26 बाकांवर 100 लोकं बसू शकतात.

– पर्यावरण पूरक 130 झाडे लावली आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“कृष्णा चमकला, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर 44 धावांनी मात, मालिकेत आघाडी”

संजय राऊत तुमची जागा आता “आत”, त्यामुळे धमक्या देणं बंद करा; नारायण राणेंचा हल्लाबोल

“अमरावतीचे पालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर रवी राणा समर्थकांनी फेकली शाई”