आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोना पसरण्यास काँग्रेस कारणीभूत असल्याचं संसदेत म्हटलं होतं. तसेच कोरोनाच्या संकटात काँग्रेसने मुंबईतील यूपी, बिहारींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी पैसे दिले. गावाला जा आणि कोरोना पसरवा, असं काँग्रेसचे लोक म्हणत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत केला होता. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : मुंबई अनलॉक कधी होणार?; महापौर किशोरी पेडणेकर, म्हणाल्या…
माननीय प्रधानमंत्री तुम्ही महाराष्ट्राला कोविड सुपर स्प्रेडर कसे बोलले? याला वैज्ञानिक दृष्टीकोनही नाही. महाराष्ट्राची मुलगी आणि खासदार म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे न्याय मागते तुम्ही असे का बोललात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
माननीय प्रधानमंत्री तुम्ही महाराष्ट्राला कोविड सुपर स्प्रेडर कसे बोलले? याला वैज्ञानिक दृष्टीकोनही नाही. महाराष्ट्राची मुलगी आणि खासदार म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे न्याय मागते तुम्ही असे का बोललात? – खा. @supriya_sule #महाराष्ट्रद्रोही_bjp
— NCP (@NCPspeaks) February 8, 2022
सातत्याने महाराष्ट्रावर टीका करणे, राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प हे महाराष्ट्रातून बाहेर नेणे, मुंबईचे महत्त्व कमी करणे यात त्यांना कसली गंमत येते? हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असा घणाघात सुप्रिया सुळेंनी यावेळी केला.
सातत्याने महाराष्ट्रावर टीका करणे, राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प हे महाराष्ट्रातून बाहेर नेणे, मुंबईचे महत्त्व कमी करणे यात त्यांना कसली गंमत येते? हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. – खा. @supriya_sule #महाराष्ट्रद्रोही_bjp
— NCP (@NCPspeaks) February 8, 2022
महत्वाच्या घडामोडी –
लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला; आता मनसेचीही प्रतिक्रिया, म्हणाले…
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध; पोलिसांनी घेतलं शिवसैनिकांना ताब्यात
‘नमस्ते ट्रम्प’ मुळं देशात कोरोना पसरला, याला जबाबदार फक्त पंतप्रधान मोदीच- नवाब मलिक