आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीनं देशात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोनामुळं अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशातच आता शिवसेनेच्या माजी खासदाराचं देखील कोरोनामुळं निधन झालं आहे.
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचं देखील कोरोनामुळे निधन झालं आहे. पिंपरी चिंचवडमधील ज्युपिटर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गजानन बाबर यांना 10 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ज्युपिटर रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.
हे ही वाचा : “मनसेत इनकमिंगचा जलवा, मानखूर्द येथील शेकडो मुस्लिम तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा”
दरम्यान, 1990 साली बाबर यांनी वाई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. बाबर यांनी त्यांच्या पुढील कारकीर्दीमध्ये पिंपरी चिंचवड येथून राजकारणाला सुरूवात केली. बाबर यांनी पिंपरी चिंचवड येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
स्वबळावर लढू, तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
“मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”
मी तर म्हणते शिवसेनेच्या एकेकाला ठोका, सोडू नका; भाजप खासदार पूनम महाजन यांचा हल्लाबोल