Home देश राज्यपालांनी 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचा नागरी सत्कार करू- संजय राऊत

राज्यपालांनी 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचा नागरी सत्कार करू- संजय राऊत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

आम्ही वारंवार सांगत असतो की, मुंबईवर घाला घलण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईवर सातत्याने अन्याय केला जातोय. मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईतील भाजपच्या नेत्यांनी याबदल बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचं आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल”

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याबद्दल संजय राऊतांनी कोश्यारी यांचे आभार मानले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरीषदेच्या 12 जागांचा निर्णय घेतल्यास त्यांचा नागरी सत्कार करु, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीलाच खिंडार पाडल्याशिवाय राहणा नाही; भाजप नेत्याचं राष्ट्रवादी नेत्याला जोरदार प्रत्युत्तर

अर्थसंकल्प नाही हा तर निवडणूक संकल्प; जयंत पाटलांची टीका

“युवासेनेचा भाजपला दणका, ‘या’ नेत्यानं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”