आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : कोर्टासमोर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांना कोर्टाने मोठा दणका दिलाय. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पहायला मिळालं.
हे ही वाचा : राष्ट्रवादीलाच खिंडार पाडल्याशिवाय राहणा नाही; भाजप नेत्याचं राष्ट्रवादी नेत्याला जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, जामीन अर्ज फेटाळल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर येऊन आपल्या गाडीमध्ये बसले. त्यानंतर त्यांची गाडी पोलिसांनी अडवून ठेवली. त्यामुळे नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच संतापले आणि गाडी का अडवली असा जाब विचारु लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना सवाल केला.
महत्वाच्या घडामोडी –
अर्थसंकल्प नाही हा तर निवडणूक संकल्प; जयंत पाटलांची टीका
“युवासेनेचा भाजपला दणका, ‘या’ नेत्यानं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”
आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची टीका