आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप खासदार पूनम महाजन यांनी आज बोलताना शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या विरोधात बोलायचं नाही, अशी सूचना मी कधीही कार्यकर्त्यांना दिली नाही. मी तर म्हणते एकेकाला ठोका, सोडू नका, असा हल्लाबोल पूनम महाजन यांनी यावेळी केला. आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कोरोनाला हरवलं, अवघ्या 7 दिवसांतच केली कोरोनावर मात”
दरम्यान, 2019 मध्ये भाजपसोबत दगाबाजी झाल्यानं राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर राज्यात कोरोनाचं मोठं संकट आलं. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात टाहो फोडायला सुरुवात केली. पण, कोरोनाकाळात फक्त भाजपचे कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला धावून गेले होते. त्यावेळी कोणीही पुढे आले नव्हते. शिवसेनेचा शाखाप्रमुखही रस्त्यावर दिसला नव्हता., अशी टीकाही पूनम महाजनांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही”
औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार; पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले…