आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. तसेच याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. अशाही चर्चा सध्या राज्यात सूरू आहेत. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्रिमंडळात मास्कबाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. अजित पवार आज पुण्यात होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
हे ही वाचा : “आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करणार की नाही, याचा निर्णय केवळ राज ठाकरे घेतील”
उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क हे राहिलंच पाहिजे असं आमचं मत आहे, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत; नवाब मलिकांचा मोठा गाैफ्यस्फोट
‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-आस्मानाचा फरक, मात्र काहींनी…’, अजित पवारांचा भाजपाला टोला
ठाकरे सरकार मद्यविक्रीचा व्यवसाय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र…; चंद्रकांत पाटलांची टीका