आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, अशी टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांनीच बाबासाहेबांनी दिलेल्या अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला, खोटी अॅट्रॉसिटी लावली, यापुढे बीड जिल्ह्यात असे प्रकार चालणार नाहीत, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला. केज नगरपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी पंकजा त्या बोलत होत्या.
केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे यांनी डॉ. बाबासाहेबांचा अपमान केलाय, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याला आज पंकजा मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हे ही वाचा : राष्ट्रवादीचं काँग्रेसला मोठं खिंडार, मालेगावमध्ये 27 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद 32 व्या क्रमांकावर आहे. मी मंत्रीपदी असताना पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझं नाव होतं. 32 व्या नंबरपर्यंत आम्ही कधीही घसरलो नाहीत, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. मात्र याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, ‘पंकजा मुंडे यांनी माझी औकात काढली. माझं मंत्रीपद काढलं. हा माझा नव्हे तर माझ्या खात्याचा म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा आणि पर्यायानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे’, असं धनंजय मुंडे म्हणाले होते.
महत्वाच्या घडामोडी –
नगरपंचायत निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे हताश झालेत, त्यामुळे…; चंद्रकांत पाटलांचा पलटवार