Home महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा; नाना पटोलेंचं चंद्रकांत पाटलांना...

राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा; नाना पटोलेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती, त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पहाटे सत्ता गेल्यामुळे भाजप पाण्याती माशासारखा तडपत आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सत्ता बरखास्त करा, असं नाना पटोले  यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : बाळासाहेब ठाकरे आज असते तर…; संजय राऊतांनी दिला आठवणींना उजाळा

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अडचणीत आलाय. त्यावर भाजप का बोलत नाही? गुंडाची चर्चा त्या प्रवृत्तीचे लोक करतात. त्यावर मी बोलणार नाही. समोरचा व्यक्ती सांगतोय मग हे गुंड आहे का?, असं सांगतानाच गुंडाला प्रेमाची भाषा कळत नाही. त्यामुळे गुंडाला मारणार असं मी म्हणालो. याचा अर्थ जीवे मारणार असा होत नाही. मूळ विषयाला बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मी ज्या गावगुंडाबाबत बोललो होतो. तो सर्वांसमोर आला आहे. आता या विषयावर मी बोलणार नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकार बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

“अमोल कोल्हेंनी देशाची माफी मागावी, अन्यथा…”

कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत? चंद्रकांत पाटलांचा सवाल