Home देश BUDGET 2022 : आयकर नियमांबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नमधील चुका...

BUDGET 2022 : आयकर नियमांबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नमधील चुका सुधारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसचं आयकर नियमांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या जातील असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोठ्या घोषणांपैकी एक अद्ययावत परताव्याशी संबंधित आहे. कर परताव्यामध्ये आता चूक आढळून आल्यास करदाते मूल्यांकन वर्षापासून दोन वर्षांसाठी अपडेटेड रिटर्न भरू शकतील.

हे ही वाचा : नितेश राणेंना मोठा दणका; सुप्रीम कोर्टानेही जामीन अर्ज फेटाळला

इन्कम टॅक्स स्लॅबवर करदात्यांना कोणताही सवलत मिळालेली नाही. इन्कम टॅक्स रिटर्न स्लॅब तसाच आहे. यामध्ये कोणतीही थेट सवलत देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, अर्थसंकल्पामुळे कामगार वर्गाची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. प्राप्तिकराच्या मूळ सूटमध्ये अर्थमंत्र्यांनी कोणतेही बदल केले नाहीत.

महत्वाच्या घडामोडी –

नितेश राणेंना मोठा दणका; सुप्रीम कोर्टानेही जामीन अर्ज फेटाळला

छगन भुजबळांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं खास स्वागत; राजकीय चर्चांना उधाण

मी तर म्हणते शिवसेनेच्या एकेकाला ठोका, सोडू नका; भाजप खासदार पूनम महाजन यांचा हल्लाबोल